Breaking News

कामगार नेते सुधीर घरत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

उरण : बातमीदार
भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते म्हणून सुपरिचित असलेले सुधीर घरत यांचा 51 वा वाढदिवस शनिवारी (दि. 5) विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
नवघर येथे सुधीर घरत यांच्या निवास स्थानी माधवबागतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा नवघर येथे वह्यावाटप व शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. आदिवासी आश्रमशाळा चिरनेर येथे अन्नदान करण्यात आले. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून कामगार नेते सुधीर घरत यांचा 51 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ‘रयत’चे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, भाजप नेते दौलतशेठ घरत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरीत, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, कामगार नेते तथा भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, दिनेश घरत, उरण पं. स. सदस्य दीपक ठाकूर, उद्योगपती सुदीप पाटील, राजेंद्र घरत, नवघरचे उपसरपंच दिनेश बंडा, सदस्य कुंदन कडू, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील, योगेश तांडेल, जयप्रकाश पाटील, जयप्रकाश भोईर, अजित पाटील, संकेत कडू, नितीन पाटील, हरेश बंडा, ज्ञानेश्वर भोईर, अमित जोशी, भूपेंद्र कडू आदी उपस्थित होते. अनेकांनी प्रत्यक्ष तर अनेक व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुधीर घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply