Breaking News

दिघाटी येथील नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन व खार बंदिस्त फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच रजनी हिरामण ठाकूर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाकडे सरपंच रजनी ठाकूर यांनी हे निवेदन सुपूर्द केले. पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे परतीच्या पावसामुळे पूर येऊन व खार बंदिस्त फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 18 ते 20 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दिघाटी हद्दीतील खाडी जवळील धूप प्रतिबंधक बंधारा 10 ते 12 ठिकाणी तुटला आहे. त्यामुळे पूराचे पाणी शेतीमध्ये शिरल्याने लागवड केलेली शेती कुजून गेली आणि सुमारे 100 घरणमध्ये शिरून त्यांचे साठवून ठेवलेले धान्य, कपडे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरीत नुकसानभरपाई देण्यात यावी.
उधाणाचे पाणी शेतात शिरून शेती ना पीक होण्याचा धोका असल्याने तुटलेला बांधार्‍याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी दिघाटीच्या सरपंचांनी तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देऊन केली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी तहसीलदार विजय पाटील यांना फोनवरून दिघाटी येथिल शेतकर्‍यांचे लवकरात लवकर पंचनामे करावे व खारबंदिस्ती तुटल्याची जाऊन पाहणी करून लवकरच लवकर बांधावे, असे सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply