
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील आगरदांडा ते सावली रस्त्याची चाळण झाली असून, या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पावसाळ्यापुर्वी दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे.
मुरुड तालुक्यातील खड्डे बुजवण्यासाठी दोन वर्षाकरिता दीड कोटी रुपये येथील सार्वजनिक बांधकाम खात्यास प्राप्त झाले होते. मात्र चौपदरीकरण होणार म्हणून आगरदांडा ते सावली या रस्त्यावरील खड्डे मागील दोन वर्षापसून बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे. आगरदांडा ते सावली या रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे अनेक छोटे- मोठे अपघात झाले आहेत. चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. खड्डयामुळे या रस्त्यवरून रात्रीचा प्रवास आम्ही टाळतो, असे नांदला, उसडी, चिंचघर, टोके खार, सावली येथील ग्रामस्थ सांगतात.