नवी मुंबई : बातमीदार
मुंबईच्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाली आहे. ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकल सेवा ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. साधारण साडेतीन वाजल्यापासून या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील रेल्वे उशिराने धावण्याची शक्यता आहे. सध्या तरी याचा परिणाम केवळ लोकलच्या सेवांवर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील सर्व लोकस सेवा ठप्प झाली आहे.
सध्या हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम मध्य रेस्वेकडून युद्धपातळीवर सुरू असून, या बिघाडामुळे सीएसएमटीकडून येणार्या आणि सीएसएमटीकडे जाणार्या गाड्यांवर याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …