Breaking News

समर्थ प्रकटदिन सोहळा मानघर येथे उत्साहात

उरण : वार्ताहर : पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 7) स्वामी समर्थ मठ-मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल, उरण, नवी मुंबई, अलिबाग, ठाणे, कल्याण, अलिबाग, दादर आदी ठिकाणाहून पाच हजारांहून अधिक स्वामीभक्त उत्सवात सहभागी झाले होते. या प्रकटदिनाच्या निमित्ताने सकाळी 6 ते 7 स्वामी चरण पादुका व मूर्ती अभिषेक तसेच समस्त देवता पूजन करण्यात आले. या सोहळ्यात भजन, आरती, अखंड भंडारा, हेल्पेज इंडिया आणि ओएनजीसी  पनवेल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप, मोफत डोळे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे इएचआय हॉस्पिटल सानपाडा यांच्या सौजन्याने संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली. दुपारी 12 वाजता आरती होताच उपस्थितांना थंडगार उसाचा रस देण्यात आला. दुपारी सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. सायंकाळी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा संपन्न झाला. रात्री 8 ते 11 वाजेदरम्यान मराठी अस्मिता जपणारा, मराठमोळ्या संगीताने नटलेला नृत्यमय महाआविष्कार महाराष्ट्र गाथा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी आयोजकांनी भक्तांची चांगली व्यवस्था केली होती.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply