Breaking News

पनवेल तालुक्यात 158 नवे पॉझिटिव्ह

चार जणांचा मृत्यू; 122 रुग्ण कोरोनामुक्त

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाचे 158 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 76 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 46 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 10, पनवेल साठेवाडा, पनवेल प्रभुआळी येथील शारदा निवास, कामोठे सेक्टर 10 गावदेवी मंदिराजवळ येथील प्रत्येकी एक अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 859   झाली आहे. कामोठेमध्ये 33  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1052 झाली आहे. खारघरमध्ये 14 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 967 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 22 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 821 झाली आहे. पनवेलमध्ये 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1010 झाली आहे. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 281 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 49990 रुग्ण झाले असून 3409 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.31 टक्के आहे. 1463 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 118  जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल 18, नवीन पनवेल 20, कळंबोली आठ, कामोठे 12, खारघर 10 आणि तळोजा येथील आठ रुग्णांचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 4990 रुग्ण झाले असून 3409 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.31 टक्केआहे.1463 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये आढळलेल्या रुग्णांत डोलघर सात, उलवे सहा, करंजाडे सहा, आकुळवाडी तीन, कराडे खुर्द तीन, आदई, आजिवली, भिंगारवाडी, हेदुटणे, जांभीवली, कराडे बुद्रुक, कासप, कोन, मोर्बे, नांदगाव, नेरे, न्हावा, ओवळे, पालेबुद्रुक, शिरढोण, सुकापूर, उसर्ली, वारदोली, वावेघर, विचुंबे, विहीघर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांमध्ये उलवे आठ, आदई चार, करंजाडे तीन, आकुर्ली, चिखले, कोन, पळस्पे, साई, शिवकर येथील प्रत्येकी दोन, आजिवली, बामणडोंगरी, भिंगार, चिंध्रण, देवद, दुंदरे, डेरवली, केळवणे, कोंडले, कोपर, मोर्बे, नितळस, नांदगाव, पालेबुद्रुक, सवणे, वहाळ, वलप, वावंजे, वावेघर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 1606 रुग्ण झाले असून 1073 जणांनी कोरोनावर मात केली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 502 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उरण तालुक्यात 14 रुग्णांची भर

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुक्यात सोमवारी कोरोनाने कोप्रोली येथील एका रुग्णाचा बळी घेतला असून, तालुक्यात कोरोनाच्या मृत्यूची संख्या आत्ता 18 पोहोचली आहे. तर दिवसभरात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आढळलेल्या रुग्णांमध्ये गणेश नगर करंजा रोड तीन, जसखार, म्हातवली, खोपटे धसाखोशी कोप्रोली, नागाव रोड, वशेणी,  जेएनपीटी रोड, भेंडखळ, किरण सोसायटी करंजा रोड, मुळेखंड कोळीवाडा हनुमान मंदिर जवळ, भेंडखळ, मोठी जुई येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये उरण दोन, जसखार तीन, मोरा दोन, सारडे, जासई, वैश्वि, बोकडविरा व चिरनेर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यातील 641 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, 459 रुग्ण  बरे झाले आहेत. तर 18 नागरिकांचा बळी गेला आहे.

महाडमध्ये तब्बल 35 जण कोरोनाबाधित

महाड : महाड तालुक्यात सोमवारी एकूण 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सात जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. भविष्यात महाड साठी 100 बेडच्या कोरोना सेंटरची आवश्यकता आहे अन्यथा परस्थिती हाताबाहेर जाऊ गंभीर होऊ शकते.

महाड मध्ये नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये नवेनगर 54 वर्षीय स्त्री, पानसरे मोहल्ला 75 व 70 वर्षीय पुरुष, काकरतळे 37 वर्षीय पुरुष, कोल 24 वर्षीय पुरुष, काकरतळे 36 वर्षीय पुरुष, गोंडाळे गवळवाडी 30, 33 व 30 वर्षीय पुरुष, चोचिंदे 20 वर्षीय पुरुष, जुई 31 पुरुष, सुभलम 44 वर्षीय पुरुष, सावित्री एन्क्लेव्ह 40 वर्षीय पुरुष, बारसगाव 26 वर्षीय पुरुष, टाकीचाकोंड बिरवाडी 30 वर्षीय पुरुष, मांघरुण 27 वर्षीय पुरुष, भारतनगर बिरवाडी 28 वर्षीय पुरुष, करंजखोल 37 वर्षीय पुरुष, एमआयडीसी महाड 55 वर्षीय पुरुष, गांधीटॉकीज 28 वर्षीय पुरुष, चवदारतळे 32 व 30 वर्षीय पुरुष, भिवघर 54 वर्षीय पुरुष, एमजी रोड 75 वर्षीय स्त्री, 45 व 19 वर्षीय पुरुष, बिरवाडी 43 वर्षीय पुरुष, महाड 14, 37 व 59 वर्षीय पुरुष, काळीज बिरवाडी 43 वर्षीय स्त्री व 31 वर्षीय पुरुष, महाड 57 वर्षीय स्त्री आणि 33 वर्षीय पुरुष यांना लागण झाली आहे.

महाड तालुक्यात 82 रुग्ण उपचार घेत असुन, 104 रुग्ण बरे झाले आहेत तर अजुन पर्यंत 201 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कर्जत तालुक्यात सात नवीन कोरोनाग्रस्त

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात सोमवारी नेरळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कर्जत तालुक्यात नवीन सात रुग्णांची भर पडल्याने आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 347 झाली आहे. तर 243 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कर्जत तालुक्यात सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये मुद्रेबुद्रुक 30 वर्षीय युवक, नवीन एसटी स्टँड जवळील एका इमारतीत राहणारी 45 वर्षीय महिला, भिसेगाव मधील 26 वर्षीय तरुण, त्याच परिसरातील 40 वर्षीय व्यक्ती, मुद्रे परिसरात राहणारी 40 वर्षीय महिला, तसेच कर्जत शहरातील 60 वर्षीय महिल, नेरळ नजीकच्या माणगावमधील 32 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.

नवी मुंबईत 286 जणांना लागण

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी 286 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या 11 हजार 712 झाली आहे. तर 204 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या सात हजार 417  झाली असून नवी मुंबईचा रिकव्हरी रेट  63 टक्क्यांवर स्थिरावला आहे. सोमवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 345 झाली आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत 29 हजार 717 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17 हजार 609 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 950 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 38, नेरुळ 62, वाशी 36, तुर्भे 22, कोपरखैरणे 31, घणसोली 43, ऐरोली 43 व दिघा 11 असा समावेश आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply