Breaking News

‘आपला दवाखाना’चा खारघरमध्ये सर्वाधिक लाभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दवाखान्यात मोफत उपचारांसह सर्व प्रकारच्या तपासण्या होतात. रायगड जिल्ह्यात या उपक्रमाचा लाभ घेणार्‍यांची सर्वाधिक नोंद खारघरमध्ये झाली आहे.
आरोग्याच्या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. या दवाखान्यात बाह्यरुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण असल्याने महिन्यातून नेत्रतपासणी, महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे बालरोग, स्त्रीरोग, त्वचा, डोळ्याचे आजार आदी अनेक आजारांवर तपासणी, उपचार होणार आहेत. विशेष म्हणजे पाच लाख लोकसंख्या असलेल्या खारघर वसाहतीत एकमेव दवाखाना असताना खारघरमधील दररोज दीडशे ते दोनशेहून अधिक रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत.

सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा
खासगी रुग्णालयात सर्वसामान्य उपचार, विविध तपासणी शुल्क तसेच रक्तचाचणीसाठीही पैसे आकारले जात असल्याने हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागतात. हा खर्च सर्वसामान्य कुटुंबांना शक्य नाही. याउलट आपला दवाखान्यातील मोफत सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असल्यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे. खारघरमध्ये दररोज दीडशे ते दोनशेहून अधिक रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित असते. त्या अनुषंगाने महिला रुग्णांना विविध आरोग्य सुविधा दवाखान्यात उपलब्ध होत आहेत. शिवाय तज्ज्ञ डॉक्टर, औषध आणि रक्तचाचणी मोफत असल्याने खारघरमध्ये दिवसभरात दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.
-डॉ. सागर दाते, विभागीय आरोग्य अधिकारी, आपला दवाखाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ राज्यभरात सुरू करण्यात आला आहे. दवाखान्यात येणार्‍या रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा देण्यासाठी पनवेल महानगरपालिका कटिबद्ध आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply