Breaking News

मोठा खांदा येथेही शेकापला जोरदार झटका

पनवेल ः रामप्रहर वृत्त

शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराला कंटाळून मोठा खांद्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 29) भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला असून या पक्षप्रवेशाने शेकापच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शेकापचे गुरुनाथ दुन्द्रेकर, मीनानाथ भगत, सुरेश भगत, मोरेश्वर भगत, विलीन दुन्द्रेकर, राहुल दुन्द्रेकर, भाई भगत, पंडित भगत, वैभव दुन्द्रेकर, अक्षय भगत, गणेश कावळे, संतोष कावळे, महेश कावळे, श्रीकांत कावळे, योगेश कावळे, अजय कावळे, मच्छिंद्र कावळे, प्रदीप राठोड, रोहन कावळे, शुभम कावळे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, सीता पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या रेखा म्हात्रे, युवा नेते सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply