Breaking News

बेलापूर-पेंधर मेट्रोचा तळोजा एमआयडीसीपर्यंत होणार विस्तार

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर-पेंधर मेट्रो प्रकल्पाचा तळोजा एमआयडीसीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प पुढे वाढविण्यात येणार असून या मेट्रो जाणार्‍या रस्त्यावरील प्रकल्पाच्या मातीचे परीक्षण प्रक्रियेला सुरुवात

झाली आहे. तळोजा एमआयडीसीतील कामगारांना तसेच उद्योजकांना सुखकर प्रवास व्हावा, यासाठी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सिडकोकडे नवी मुंबई मेट्रो तळोजा औद्योगिक क्षेत्रापर्यंत नेण्याची मागणी केली होती व यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून अखेर एमआयडीसी आणि सिडकोने बेलापूर-पेंधर प्रकल्पाबरोबरच पावनेचार किलोमीटर मेट्रोचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार तळोजा एमआयडीसी परिसरात मेट्रोच्या रस्त्यावरील प्रकल्पाची माती परीक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. यानंतर लवकरच कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

बेलापूर ते तळोजा एमआयडीसीपर्यंत सुरु होणारी ही इंडस्ट्रीज आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना वरदान ठरेल तसेच हे मेट्रो स्थानक लवकरात लवकर सुरु होईल.

-सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply