Friday , September 22 2023

भाजपचे किसान मोर्चाने यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी रविवारी (दि.3) शहरातील मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारूशिला घरत, किसान मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अनिल ढवळे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष आत्माराम भगत, कर्जत सरचिटणीस राजेश भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊसच नाही अशा परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आमदार महोदयांनी याबाबत पाठपुरावा करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी केली. प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोलंकी यांनी शेतीविषयक योजना, त्याची अंमलबजावणी, शेतकर्‍यांना मिळणारे लाभ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply