नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात 971 क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू असणार आहेत. आयपीएल लिलावासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रिया 30 नोव्हेंबरला संपली. आता सर्व संघांना इच्छुक खेळाडूंची नावे देण्यासाठी 9 डिसेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
एकूण सर्व संघांमधील 73 जागांसाठी होणार्या लिलावात 215 आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू, 754 नवोदित खेळाडू आणि दोन सहसदस्य राष्ट्रांतील खेळाडूंचा समावेश आहे. लिलाव प्रक्रियेचे काम ह्यू एडमीड्स पाहणार आहेत. या लिलावात प्रक्रियेत विविध परदेशी खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकूण 55 खेळाडूंनी आयपीएल 2020साठी नोंदणी केली आहे.
आयपीएल 2020साठी
नोंदणी केलेले परदेशी खेळाडू
ऑस्ट्रेलिया 55
दक्षिण आफ्रिका 54
श्रीलंका 39
वेस्ट इंडिज 34
न्यूझीलंड 24
अफगाणिस्तान 19
बांगलादेश 6
झिम्बाब्वे 3
नेदरलँड्स 1
अमेरिका 1, इंग्लंड 22
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू 19, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेले भारतीय खेळाडू 634, टीम इंडियाकडून न खेळलेले पण आयपीएलचा किमान 1 सामना खेळलेले भारतीय 60.
युवा खेळाडूंवर नजर
यशस्वी जैस्वाल (मुंबई) : मुंबईच्या या फलंदाजाने आकर्षित केले आहे.
आर साई किशोर (तामिळनाडू) : या डावखुर्या फिरकीपटूने तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये छाप पाडली.
प्रियम गर्ग (उत्तर प्रदेश) : 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे नेतृत्व प्रियम गर्गकडे देण्यात आले आहे.
इशान पोरेल (प. बंगाल) : ताशी 140 किमी वेगाने मारा करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे अवगत आहे.
रोहन कदम (कर्नाटक) : कर्नाटकला टी-20 स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले.
रवी बिश्नोई (राजस्थान) : 19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी फिरकीपटूचा भारतीय संघात समावेश झाला आहे.
एम. शाहरूख खान (तामिळनाडू) : या खेळाडूने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. विराट सिंग (झारखंड) : सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने धावा केल्या.