Breaking News

पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले कर्नाळा अभयारण्य

उरण : प्रतिनिधी – लॉकडाऊन, संचारबंदीदरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे येथील कर्नाळा अभयारण्यात कधी नव्हे ती निरव शांतता पसरली आहे. या शांततेत अभयारण्यात विविध पक्षांचा मंजुळ आवाजाचा किलबिलाट वाढला आहेच. त्याशिवाय अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणार्‍या आणि सर्वकाळ खाद्यासाठी रस्त्यांवरच ठाण मांडून बसणारे सुमारे 80 टक्के कावळे आणि माकडांनी आता आपला मोर्चा अभयारण्याकडे वळविला असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्य विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रदिप चव्हाण यांनी दिली आहे.

 मुंबईपासून जवळच असलेले पनवेल येथील कर्नाळा अभयारण्य एक पर्यटनस्थळ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आल्यामुळे अभयारण्यात वातावरण, आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे परिसरात कधी नव्हे ती निरव शांतता पसरली आहे. या शांततेत अभयारण्यात विविध पक्षांचा मंजुळ आवाज ऐकू येऊ लागला आहे. विविध जातींच्या पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. अभयारण्य बंद करण्याआधी मोठ्या प्रमाणावर माकडे महामार्गावरील विविध रस्त्यांवरच ठाण मांडून बसलेले असायचे. दररोज येथे येणार्‍या-जाणार्‍या हजारो पर्यटकांकडून मिळणार्‍या खाद्यपदार्थांमुळे माकडे अभयारण्याकडे फिरकत नव्हती. अशीच स्थिती कावळ्यांची होती.

लॉगडाऊन, संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणार्‍या आणि सर्वकाळ खाद्यासाठी रस्त्यांवरच ठाण मांडून बसणारे कावळे आणि माकडांनी पोट भरण्यासाठी आता आपला मोर्चा कर्नाळा अभयारण्याकडे वळविला आहे. त्यामुळे बंदीनंतर अभयारण्यात कधीही न दिसणार्‍या कावळे आणि माकडांची संख्या आता 70 ते 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्य विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रदिप चव्हाण यांनी दिली आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply