कामोठे : रामप्रहर वृत्त गोवा येथे झालेल्या प्रथम कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशन कामोठे शाखेच्या आठ खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये चार सुवर्ण व चार रौप्य पदक मिळवत खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. यामध्ये शिवराज चव्हाण -सुवर्ण पदक, श्रेयस म्हात्रे -रौप्य, रितेश गोवारी -सुवर्ण, प्रणव सावंत -रौप्य, सोनम राजिवडे -रौप्य, आदेश शेपोंडे -सुवर्ण, सुजय वेंगुर्लेकर -सुवर्ण, स्वप्नाली सणस -सुवर्ण अशाप्रकारे खेळाडूंनी पदक मिळविले. या यशाबद्दल युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मंदार पनवेलकर, सर्व सिनियर प्रशिक्षक व सागर कोळी यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनतर्फे अभिनंदन केले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …