पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोसियशन, रायगड जिल्हा बुद्धिबळ क्रीडा सर्कल यांच्या मान्यतेने प्रथम कोकण प्रतिष्ठान चषक खुली अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय मानांकन जलद (रॅपिड) व अतिजलद (ब्लीटझ) बुद्धिबळ स्पर्धा कोकण प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल चेस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी (दि. 25) व रविवारी (दि. 26) रोजी घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा पनवेल येथील के. ए. बांठिया स्कूलच्या वातानुकूलित सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे.
प्रथमच रायगडमध्ये रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा एकाच गटात होत असून या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 50 हजार व चषक, तसेच एकूण रुपये तीन लाख 50 हजारांची रोख पारितोषिके प्रत्येक गटानुसार 30 चषक व 80 पदके प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे एकाच गटात ब्लीटझ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा रविवारी (दि. 26) रोजी दुपारी 1 वाजता आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेत प्रत्येक गटानुसार एकूण 30 चषक, तसेच 40 पदके प्रदान करण्यात येणार आहेत. या बुद्धिबळ स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी अंतिम नावनोंदणी दिनांक 22 मे 2019 आहे. अधिक माहितीसाठी समीर परांजपे 7506364725, सी. एन. पाटील 9326504179, मंगला बिराजदार 9920156144 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण प्रतिष्ठानचे पनवेल अध्यक्ष दिलीप नाईक यांनी केले आहे.