Breaking News

शिवशौर्य यात्रेचे पनवेलमध्ये भाजपकडून जोरदार स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष व विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्तीनिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल प्रखंडच्या साथीने आयोजित करण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचे पनवेलमध्ये भाजपच्या वतीने पुष्पवृष्टी, वाद्यांच्या गजरात आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) जोरदार स्वागत करण्यात आले.
या यात्रेची सुरुवात सिंधुदुर्ग येथून झाली असून सांगता मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणार आहे. पनवेलमध्ये शिवशौर्य यात्रेचे आगमन तक्का झाल्यानंतर तिथून भाजप पनवेल कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुढे रोडपाली, कळंबोली, कामोठे असे मार्गक्रमण करीत बाईक रॅली झाली.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. उपस्थितांनी दिलेल्या जय श्रीराम, बजरंग बली की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Check Also

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद …

Leave a Reply