Breaking News

संघटनात्मक काम करून भाजप बळकट करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे वॉरियर्सना आवाहन

उरण : वार्ताहर
भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा मतदारसंघातील वॉरियर्सची बैठक मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) झाली. या वेळी त्यांनी संघटनात्मक काम करून पक्ष बळकट करा, असे आवाहन केले.
उरण द्रोणागिरी नोड येथील स्व. भागुबाई ठाकूर विद्यालयात झालेल्या बैठकीत पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 11 ऑक्टोबरला पनवेलमध्ये येणार आहेत. त्या वेळी पनवेलसह उरण आणि कर्जत मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.
या बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष व उरण विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख श्रीनंद पटवर्धन, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस चंद्रकांत घरत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप खालापूर तालुका माजी अध्यक्ष रामदास ठोंबरे, भाजप पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष नीलकंठ घरत, पी. के. ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेवक राजू ठाकूर तसेच धनाजीशेठ ठाकूर, मनोहर सहतीया, महिला मोर्चा उरण तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष संगीता पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply