Breaking News

साई येथील कबड्डी स्पर्धेत जयबाबदेव म्हसोबा गोंडघर विजयी

माणगाव : प्रतिनिधी

साई राम बाबदेव क्रीडा मंडळ साई यांच्या प्रथम क्रीडा कबड्डी महोत्सावात आयोजित कबड्डी स्पर्धेत जयबाबदेव म्हसोबा गोंडघर संघाने चित्तथरारक अशा अंतिम सामन्यात सोमजाई भैरव क्रीडा मंडळ  आगरवाडा म्हसळा या संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 15000 व आकर्षक चषक पटकाविला.

या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते. साई राम बाबदेव क्रीडा मंडळ प्रथम कबड्डी महोत्सवात  जयबाबादेव म्हसोबा गोंडघर संघाने प्रथम क्रमांक पटकाविल्याने त्यांचे माणगाव, म्हसळा तालुक्यात अभिनंदन होत आहे. स्पर्धेतील उपविजेते सोमजाई भैरव क्रीडा मंडळ कबड्डी संघास 10,000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री हनुमान क्रीडा मंडळ नाणोरे माणगाव या संघास 5000 व चषक, चतुर्थ क्रमांक जाकमाता कापोली श्रीवर्धन संघास 5,000 व चषक देऊन गौरविण्यात आले, तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून भैरव आगरवाडा म्हसळा संघाच्या हरिदास भायदे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून भैरव आगरवाडा म्हसळा संघाचा हरिदास भायदे याची निवड करण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रकाश दगडू गायकर यांच्याकडून कै. दगडू गायकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. द्वितीय क्रमांक अशोक रामभाऊ गायकर यांच्याकडून कै. सुडकोजी गायकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. तृतीय क्रमांक नारायण पवार, राजेंद्र खाडे माणगाव, चतुर्थ क्रमांक आप्पा ढवळे भाजप अध्यक्ष माणगाव, शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी कै. पांडुरंग आबाजी दळवी यांच्या स्मरणार्थ विजय पांडुरंग दळवी यांच्याकडून देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेन रहाटविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण समांरभ प्रकाश दगडू गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी माणगाव पं. स. उपसभापती गजानन अधिकारी, प्रवीण अधिकारी, गफारभाई रहाटविलकर, सखाराम लाड, पत्रकार स्वप्ना सांळुके, विलास सावंत, संजय गायकर, डॉ. विक्रांत कुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply