Breaking News

सर्वांना अभिप्रेत खासदार रायगडात निवडून आणू

भाजपच्या रोह्यातील बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार

धाटाव : प्रतिनिधी
दक्षिण रायगड भाजपचे संघटनात्मक बैठकांचा धडाका संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 7) रोह्याजील शासकीय विश्रामगृहत जिल्हा कमिटी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नागरिकांना रायगड जिल्ह्यात अभिप्रेत असा भाजपच्या विचारांचा खासदार निवडून आणू असा निर्धार सर्वांनी केला. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, अमित घाग यांनी गेले पाच-सहा वर्षात संघटनात्मक काम केले होते, त्यामुळेच आज रायगड जिल्हा भाजपच्या कमिटीने त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली. त्यांना मनापासून शुभेच्छा. विशेषतः बुथ कमिटी, शक्ती केंद्रप्रमुख व संघटनात्मक बांधणी मजबूत केली पाहिजे, तसेच सरल अ‍ॅप डाऊनलोड करून मोदीजींच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्याचे आवाहन धैर्यशील पाटील यांनी केले. आगामी 2024 महाविजयाच्या तयारीनिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 11 तारखेला रायगड जिल्ह्यात येत आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात संघटनात्मक बैठका घेण्यात आल्या, तसेच येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरून जिल्ह्यात भाजप निश्चित क्रमांक एकचा पक्ष असेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी सरचिटणीस प्रशांत शिंदे, बिपिन म्हणूनकर, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, श्रेया कुंटे, सोपान जांभेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस कादरी, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष निमिश वाघमारे, प्रदेश सचिव अल्पसंख्याक बबलू सय्यद, दक्षिण भारतीय पी. व्ही. सनन कुमार, कामगार नेते विवेक अभ्यंकर, नाना महाले, ज्येष्ठ नेते आप्पा देशमुख, विष्णू मोरे, मारुती देवरे, रोशन चाफेकर श्रद्धा घाग, विलास डाके, महेश ठाकूर, कृष्णा बामणे, अविनाश कान्हेकर, शिवाजी जाधव, राजेश डाके, मोरेश्वर ठाकरे, एकनाथ ठाकूर, अरुण वाघमारे, अनंत लाड, प्रियंका पिंपळे, रिया कासार यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply