Breaking News

माथेरान शटलसेवेत वाढ

माथेरान : प्रतिनिधी

मध्य रेल्वेने माथेरान ते अमनलॉज या शटलसेवेच्या  फेर्‍यांत वाढ केली आहे. माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस अनेक प्रवाशांना माथेरान ते अमनलॉज शटलसेवेचे तिकीट उपलब्ध होत नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारपासून शटलसेवेच्या फेर्‍यांत वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होवून स्थानिक व्यवसायलाही अधिक चालना मिळणार आहे.

माथेरान ते अमनलॉज स्टेशन

सकाळी- 08.15, 09.30, 10.20, 11.25

दुपारी- 12.45, 14.40, 15.30

संध्याकाळी- 16.20, 17.10

अमनलॉज ते माथेरान स्टेशन

सकाळी- 08.40, 09.55, 10.45, 11.55

दुपारी- 12.45, 14.00, 15.05, 15.55

संध्याकाळी- 16.45,17.35

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त …

Leave a Reply