पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 13) संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, कला विभागप्रमुख डॉ. यू. टी. भंडारे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एलिजाबेथ मॅथ्यूज, रूसा प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बाळासाहेब आघाव, कार्यालय अधीक्षक प्रतिभा म्हात्रे व सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी पुष्पमाला अर्पण करून स्व. चांगू काना ठाकूर यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली, तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारीवर्गानेही या वेळी सामाजिक अंतर पाळून विनम्र अभिवादन केले.