Breaking News

पनवेलमध्ये 178 नवे पॉझिटिव्ह

दोघांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.15) कोरोनाचे 178 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा  मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 140 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 226 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 38 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 3 ई प्लॉट 9  केएल 5 आणि कामोठे सेक्टर 19 सूरज रेसिडेंसी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3447 झाली आहे. कामोठेमध्ये 21 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4998 झाली आहे. खारघरमध्ये 58 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4985 झाली आहे.नवीन पनवेलमध्ये 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4017 झाली आहे. पनवेलमध्ये 12 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3704 झाली आहे. तळोजामध्ये 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 842 झाली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 21993 रुग्ण झाले असून 20099 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.39 टक्के आहे. 1389 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 505 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात आठ नवे रुग्ण; 17 जण बरे

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे आठ नवे रुग्ण आढळले व 17 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये एमटीएनएल ऑफिस आनंदनगर, सुरकीचापाडा करंजा, करंजा, म्हात्रेवाडी करंजा, मच्छीद मोहोल्ला, जेएनपीटी, स्टार कॉम्प्लेक्स म्हातवली, आवरे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1986 झाली आहे. त्यातील 1783 रुग्ण बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 102 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.     

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply