Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावाचा निर्णय

भाजपतर्फे आभार आणि जल्लोष

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी (दि. 16) मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे, त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला.

पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालय येथे उत्तर रायगड भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला. ‘दिबा’साहेबांचा विजय असो, ‘दिबा’साहेब अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानण्यात आले.

या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हा संयोजक डॉ. कृष्णा देसाई, निर्दोष केणी, मधुकर उरणकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

समितीने उभारलेले आंदोलने, मागणीचा रेटा आणि त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नामकरणासर्भात दोन वेळा बैठक झाली, मात्र ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावावर ठाम राहून आपला हेका कायम ठेवला आणि दिबासाहेबांचे नाव विमानतळाला देण्यास नकार दिला होता. सरकार अल्पमतात आल्यावर श्रेयासाठी ठाकरे यांनी अवैध्य प्रकारे निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयात कायदेशीर बाब अडसर ठरला असता त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने घाईघाईने नाही तर भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतला आहे.

-अरुणशेठ भगत, पनवेल तालुका अध्यक्ष, भाजप

खारघर : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शनिवारी झाल्याने खारघरमधील भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘दिबां’च्या नावाचा जयघोष करून जल्लोष केला. या वेळी मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी स्थायी समिती सभापति नरेश ठाकुर, माजी नगरसेवक अभिमन्यु पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील,  गुरुनाथ गायकर, युवा नेते समीर कदम, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्षा महिला मोर्चा संध्या शारबिंदरे, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, शैलेंद्र त्रिपाठी, जी. एन. गुप्ता, संदीप एकबोटे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply