आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत न्हावे ग्रामपंचायतीत प्रचार रॅली

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्यात असून भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत न्हावे ग्रामपंचायत येथे उत्कर्ष ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांचा बुधवारी (दि. 2) प्रचार करण्यात आला. या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
न्हावे ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कर्ष ग्रामविकास मंडळाच्या वतीने थेट सरपंचपदासाठी विजेंद्र गणेश पाटील; तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर; प्रभाग 2मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनिता भोईर; प्रभाग 3मधून सविता ठाकूर, जागृती भोईर आणि प्रभाग क्रमांक 4मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर विजयासाठी सज्ज झाले आहेत.
या रॅलीत माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, सी. एल. ठाकूर, प्रकाश कडू, मीनाक्षी पाटील, कल्पना ठाकूर, राम मोकल, श्रीधर मोकल, कृष्णा मोकल, शंभो मोकल, बाळकृष्ण ठाकूर, हरेश्वर कडू, अरुण मोकल, गोपीचंद ठाकूर, सदाशिव ठाकूर, गणेश मोकल, गुरूनाथ मोकल, महादेव ठाकूर, मोरेश्वर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मतदारांनी रॅलीचे स्वागत केले.

Check Also

युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा …

Leave a Reply