आमदार प्रशांत ठाकूर यांचे भिंगार ग्रामपंचायतीच्या प्रचारसभेत आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भिंगार ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेचे बुधवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी, परिसराच्या विकासासाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या वेळी केले. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी गुलाब रामदास वाघमारे तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून अतुल मधुकर कातकरी, अशोक राजाराम गायकर, शामल महेश लहाणे, प्रभाग क्रमांक 2 मधून सुनील नारायण पाटील, उज्ज्वला अबाजी वाघमारे, रिना राजेश पाटील, प्रभाग क्रमांक 4 मधून सुभाष जेठू पाटील, करीना संदेश पाटील, आशा नितीन वाघमारे उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राजेंद्र पाटील, शेडुंग गावचे माजी सरपंच रामदास दत्तू खेत्री, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल दुर्गे, मोहन दुर्गे, सुनील पाटील, रीना पाटील, सुनील पाटील, भाजप कार्यकर्ते प्रकाश खेत्री, गजानन दुर्गे, जनार्दन खेत्री, गोविंद दुर्गे, ज्ञानेश्वर खेत्री, अरुण खेत्री, राजेश पाटील, संजय पाटील, विकास मुंडे, आत्माराम लबडे, संतोष पाटील, गजानन पाटील, माजी सरपंच निवृत्ती शेंद्रे, माजी सरपंच निलेश पवार, ज्ञानेश्वर पाटील, सुनील नारायण पाटील, रिना पाटील, उज्ज्वला वाघमारे, गुलाब वाघमारे, अशोक गायकर, अतुल कातकरी, शामल लहाने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.