Breaking News

प्राची भोईर हिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक

खालापूर : प्रतिनिधी
23 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 सातारा येथील स्पर्धेत 65 किलो वजनी गटात प्राची भोईर या रायगडच्या कुस्तीपटूने कांस्य पदक मिळवले. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राची कुस्तीचा सराव करते. या स्पर्धेमध्ये सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे येथील कुस्तीपटूंचे वर्चस्व असताना प्राची भोईरने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे रायगड जिल्ह्यातून कौतुक होत आहे. येणार्‍या काळात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना प्राचीने मिळविलेले पदक ही त्याची नांदी आहे. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply