Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएल ट्रॉफीचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात येणार्‍या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीचे अनावरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) करण्यात आले.
आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 7, 8, 9 डिसेंबर रोजी पनवेल परिसरात खेळली जाणार आहे. यामध्ये पनवेल आणि पुणे विभागातील सहा संघांचा समावेश असेल.
पनवेलजवळील मानघर येथे झालेल्या आरपीएल ट्रॉफीच्या अनावरण समारंभास डॉ. संतोष जाधव, गणेश कडू, प्रितम कय्या, पंकज पाटील, रतन खारोल, सुमित झुंझारराव, विक्रम कय्या, डॉ. दिवेकर, विनोद भोईर, सिकंदर पाटील, आशिष थोरात आदी उपस्थित होते.

Check Also

बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा

मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई …

Leave a Reply