पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिवाळीनिमित्त दिव्यांची पूजा करून प्रार्थना केली जाते. यालाच अनुसरून शनिवारी (दि.11) पनवेलमध्ये दीपोत्सव साजरा झाला. या वेळी दिव्यांच्या लख्ख प्रकाशामुळे शहरातील वडाळे तलाव परिसर उजळून गेला होता.
पनवेल महापालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने तिमिरातून तेजाकडे जाणारा दीपोत्सव साजरा झाला. या वेळी वडाळे तलाव परिसर दिव्यांच्या प्रकाशाने सजला होता. या प्रकाशाच्या उत्सवाचा शुभारंभ आयुक्त गणेश देशमुख आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर या वेळी वडाळे तलाव येथे श्री राम मंदिराची प्रतिकृती दिव्यांच्या माध्यमातून साकारली गेली.
दीपोत्सवावेळी भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशिला घरत, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, राजश्री वावेकर, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, मंदा भगत, सुहासिनी केकाणे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, सुमित झुंझारराव, रोहित जगताप, अक्षय सिंग यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …