Breaking News

श्रीवर्धनमधील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न; कृष्णा कोबनाक यांची माहिती

म्हसळा ः प्रतिनिधी

 रायगडातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या तालुका शहराला जोडणे व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या गाववाडी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिफारस व विशेष प्रयत्नाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा आणि माणगाव तालुक्यातील आठ गावांंच्या रस्ता सुधारणा कामाला सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक  यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे कळविले आहे.

रस्ते विकासकामात म्हसळा तालुक्यातील दोन, श्रीवर्धनमधील एक, तळा तालुक्यातील दोन आणि माणगाव तालुक्यातील तीन गावजोड रस्त्यांचा समावेश आहे. सबका साथ, सबका विकास, हा मूलमंत्र घेऊन भाजप

गावांचा विकास करीत आहे, असे या मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी सांगितले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून त्यांनी शिफारस केलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील गावजोड रस्ते विकासकामांमध्ये प्रामुख्याने  एम. एच. एस. 4 रानवली-वडघर जोडरस्ता, लांबी 3.900 किमी, तालुका श्रीवर्धन, कामाची अंदाजित रक्कम 326.31 लाख रुपये, सावर ते चिरगाव बौद्धवाडी रस्ता, तालुका म्हसळा, लांबी 2.5 किमी, अंदाजित रक्कम 202.46 लाख रुपये, ओडीआर 129 पाष्टी ते मोरवणे रस्ता, तालुका म्हसळा, लांबी 2 किमी, अंदाजित रक्कम 121.55 लाख, खांबीवली ते रहाटाड रस्ता, तालुका तळा, लांबी 3.90 किमी, अंदाजित रक्कम 350.61 लाख, व्ही. आर. 22 ते चरई आदिवासीवाडी बेलघरनजीक रस्ता, तालुका तळा, लांबी 1.359 किमी, कामाची रक्कम 99.59 लाख, एस. एच. 98 पाणोसे रस्ता, तालुका माणगाव, लांबी 3.450 किमी, अंदाजित रक्कम 187.69 लाख रुपये, एन. एच. 17 दाखणे ते मुंडेवाडी रस्ता, तालुका माणगाव, लांबी 3.800किमी, कामाची अंदाजित रक्कम 336.21 लाख, एन. एच.17 कालवण ते कालवण आदिवासीवाडी रस्ता, तालुका माणगाव, लांबी 3.250 किमी, अंदाजित रक्कम 356.85 लाख रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे. सदर सर्व मिळून सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर केल्याचे कृष्णा कोबनाक यांनी नमूद केले आहे. सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर त्या त्या भागातील ग्रामस्थांची

दळणवळणाची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. एकमेकांपासून दूर राहिलेली ही गावे वाडीवस्ती व शहराच्या अधिक जवळ येणार आहेत. विकासाच्या दृष्टीने मंजूर झालेल्या या सर्वच कामांना महत्त्व आहे. जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याचा दृष्टिकोन ठेवून आमच्याकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात या कार्यक्रमाखाली माझ्याकडून सततचा पाठपुरावा राहील, असे कृष्णा कोबनाक यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रस्त्यावाचून वंचित राहावे लागलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील सदर आठ गावांचा मुख्य प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply