Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे शुक्रवारी उद्घाटन

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 8)होणार आहे.
पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्‍या या महाअंतिम फेरीचे उद्घाटन सकाळी 8 वाजता होणार असून या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले तसेच भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चाच्या शहरध्यक्ष राजेश्री वावेकर प्रमुख पाहुणे म्हणून तर आदरणीय उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे यांची उपस्थिती असणार आहे.
यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही पारितोषिके आहेत, तर यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप, तर सोशल मीडिया प्रायोजक इट्स माजा डॉट कॉम आहे. तीन दिवसांत दर्जेदार अशा 25 एकांकिकांचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ ठाकूर, अटल करंडक आयोजन कमिटी उपाध्यक्ष विलास कोठारी, स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी केले आहे.

अंतिम फेरीतील एकांकिका
व्हाइट लाईट, ठाणे (अनोळखी), माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन, बुलढाणा (अनपेक्षित), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक (अ डील), वसा नाट्यपरंपरेचा (काव काव), देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज, कोल्हापूर (असणं नसणं), फनकार क्रिएटीव, अहमदनगर (बोळवण), त्रिकुटालय थिएटर, पनवेल (क्वीन ऑफ द नाइट), आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे (शहीद), स्वर्ण पटकथा, क्राऊड (खुदिराम).

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply