भाजप किसान मोर्चाची मागणी; कर्जत तहसीलदारांना निवेदन
कर्जत : रामप्रहर वृत्त
कर्जत तालुक्यातील शेतकर्यांचे भात हमीभावाने खरेदी केंद्रावर खरेदी करा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कर्जत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांचे भात हमीभावाने कर्जत तालुक्यातील अनेक केंद्रावर खरेदी केली जाते. परंतु अनेक शेतकर्यांनी तकार केल्या आहेत की, 30 ऑक्टोबरपूर्वी ज्यांना भात विकायचा आहे त्यांची ऑनलाइन नोंदणी केली पाहिजे असा नियम आहे, परंतु काही शेतकर्यांना ऑनलाइन नोंदणी बद्दल माहीत नसल्याकारणाने त्यांची नोंदणी झालेली नाही. आता भात खरेदी केंद्रवाले त्यांची नोंदणी नसल्याने भात घेणार नाही असे सांगत आहेत. त्यामुळे ते भात कुठे बाहेर विकायला गेल्यास तो चौदाशे पंधराशे रुपये प्रति किंटल भाताला दर मिळतो आहे. हमीभावाने तोच भाव दीड पटीने पडतो. भात खरेदी न झाल्यास त्यांचे खूप नुकसान होणार आहे. त्यामूळे जो शेतकरी स्वत:चा सातबारा व आधारकार्ड घेवून केंद्रावर जाईल त्यांचे भात खरेदी करून घ्यावे, अशा सूचना या खरेदी केंद्र वाल्यांना द्यावा किंवा ऑनलाइन नोंदणीची मुदत काही दिवसांकरीता वाढवावी. जेणेकरून अडवणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदत होईल, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदन देताना कोकण प्रदेशचे संपर्कप्रमुख सुनील गोगटे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष शिरीष कदम, तालुका कार्यकारणी सदस्य नथू कराळे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पुणे आदी उपस्थित होते.