Breaking News

डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची वाहतूक माणगावमध्ये पकडली

तिघे गजाआड; 13 लाखांची स्फोटके जप्त

माणगाव ः प्रतिनिधी

बेकायदेशीर स्फोटक पदार्थ डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची टेम्पोतून वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या टोळीला माणगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचे सहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली.
माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांना अवैध स्फोटक पदार्थांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी पथक तयार करून माणगाव-निजामपूर मार्गावर रवाना केले. या पथकाने शनिवारी (दि.23) सकाळी संशयित बोलेरो टेम्पो (एमएच 12-एस एफ 4322) थांबवून चालक विक्रम गोपाळदास जाट (वय 26, रा. राजस्थान, सध्या घोटावडे, जि.पुणे) याच्याकडे चौकशी व तपासणी केली असता गाडीमध्ये 90 हजार 800 रुपये किमतीचे एकूण चार बॉक्स इलेक्ट्रिक डीटोनेटर, एक लाख 70 हजार रुपये किमतीचे जिलेटीन कांड्यांचे 50 बॉक्स आढळले. ही स्फोटके आणि 10 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 12 लाख 60 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही स्फोटक ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांना विकत असल्याचे सांगितल्यावर पाली व पेण येथून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जिलेटीन व 14.40 बॉक्स डेटॉविटर अशी स्फोटके हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी विक्रम गोपालदास जाट, विठ्ठल तुकाराम राठोड, राजेश सुभेसिंग राठोड या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
पत्रकार परिषदेला माणगाव तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुळे, निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक एन. डी. लहांगे, उपनिरीक्षक अस्मिता पाटील, दिनेश आघाव, किर्तीकुमार गायकवाड, सूर्यकांत भोजकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply