Breaking News

श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामजिक संस्था पुढे येत आहेत. कर्जत तालुक्यात अनेक कुटुंबांना या संकटकाळात त्यांनी मदतीचा हात दिल्याने मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणार्‍या आदिवासींना मोठा दिलासा मिळत आहे. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. भरत वाटवणी संचालित श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने कर्जत तालुक्यातील उमरोली आदिवासीवाडीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या वेळी श्रद्धा फाऊंडेशन टीमचे सदस्य आणि भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, राजेंद्र जाधव, किरण ठाकरे, पोलीस मित्र संघटना तालुका संघटक उत्तम ठोंबरे, पोलीस पाटील गणपत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर लोंगले, संतोष भासे आदी उपस्थित होते.

Check Also

एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची

शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply