माणगाव : प्रतिनिधी
पुणे कोथरूड परिसरातून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरकडे पर्यटनासाठी निघालेल्या कर्मचार्यांची खासगी ट्रॅव्हल बस शनिवारी (दि.31) सकाळी ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावच्या हद्दीत उलटली. या भीषण अपघातात दोन व्यक्ती जागीच ठार, तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त बसमधून 57 प्रवासी प्रवास करीत होते. यातील सुरभी रवींद्र मोरे (वय 23) आणि कांजन मारुती मांजरे (वय 20) या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर उर्वरित 32 पुरुष व 23 महिला असे एकूण 55 पर्यटक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व पथक घटनास्थळी पोहचले. पोलीस, रेस्क्यू टीम, या मार्गावरील प्रवासी, परिसरातील ग्रामस्थ यांनी अपघातग्रस्त बसमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …