टोकियो : वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मोरी यांनी टोकियो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर कडाडून टीका होत होती. सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार देत त्यांनी सर्वाची माफी मागितली होती, पण पुरस्कर्ते, दूरचित्रवाणीवरून सातत्याने दबाव येऊ लागल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …