खारघर : रामप्रहर वृत्त
श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणार्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यानुसार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि.16) खारघर येथील गणेश मंदिर परिसराची स्वच्छता केली.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छ तीर्थ अभियान पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यास सुरुवात झाली आहे. हे अभियान पनवेलमध्ये उत्स्फूर्तपणे राबवण्यात येत असून मंगळवारी खारघरमधील गणेश मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप नेते ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, शैलेंद्र त्रिपाठी, अॅड. अमर उपाध्याय, संतोष शर्मा, अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, नितीन मारो, वनिता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होेते. त्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेत गणेश मंदिर परिसराची साफसफाई केली.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …