उलवे नोड : रामप्रहर वृत्त
शिवाजीनगर येथील आदेश स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी खासदार चषक 2024 या भव्य ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.17) झाले.
आदेश स्पोर्ट्सच्या वतीने आणि शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून माजी खासदार चषक क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
उद्घाटन समारंभास भाजपचे शिवाजीनगर गाव अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, चंद्रकांत भोईर, सी.एल.ठाकूर, पी.के.ठाकूर, टी.के. ठाकूर, वसंत पाटील, सुधीर ठाकूर, शिवाजी ठाकूर, पी.एन.ठाकूर, साईचरण म्हात्रे, विजय ठाकूर, सुहास ठाकूर, विजय ठाकूर, किशोर घरत, व्ही.के.ठाकूर, भाऊ भोईर, नरेश मोकल, जी.के.ठाकूर, किशोर पाटील, अनंता ठाकूर, अमृत ठाकूर, जय घरत, अमोघ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते. ही स्पर्धा 21 जानेवारीपर्यंत रंगणार आहे.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …