उरण : प्रतिनिधी, बातमीदार
1984च्या शेतकरी लढ्यातील हुताम्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी बुधवारी (दि.17) पागोटे येथे अभिवादन केले.
उरण तालुक्यात 1984मध्ये झालेल्या शेतकरी लढ्यात दुसर्या दिवशी नवघर फाटा येथे कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील या पिता पुत्रांसह पागोटे येथील तीन जणांना हौतात्म्य आले. या शूरवीरांचा स्मृतीदिन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पागोटे येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, पागोटे अध्यक्ष भारत पाटील, बूथ अध्यक्ष सौरव पाटील, ज्येष्ठ नेते कुंदन पाटील, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष प्रकाश भोईर, कुंडे गाव अध्यक्ष अशोक मढवी, बूथ अध्यक्ष दिनकर पाटील, हरिश चोगले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीसी विद्यार्थ्यांच्या पथकाने हुतात्म्यांना सलामी देऊन मानवंदना दिली.
Check Also
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे
मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद …