Breaking News

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी (दि. 1) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव येथे या मोहिमेत सहभाग घेतला.
महापालिका तसेच भाजपच्या वतीने एक तारीख एक तास ही स्वच्छता मोहीम लोकसहभागातून मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी घेण्यात आली. कृष्णाळे तलाव येथील मोहिमेत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, महापालिका प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, आयुक्त गणेश देशमुख, सुधाकर देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, यतीन देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत जाधव, स्वप्नील मोरे, नितीन बानुगडे-पाटील, महावीर गुप्ता, मनपा उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, लायन्स क्लब सरगमचे सदस्य, इनरव्हिल क्लबच्या महिला सदस्य, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.
पनवेल महापालिकेतर्फे कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांतर्गत उद्याने, स्मशानभूमी, तलाव, हायवे, बाजारपेठा, बसस्टॉप, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये अशा 148 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली गेली. मनपा हद्दीतील 36 हॉस्पिटल, 46 शाळा व महाविद्यालये, 20 स्वयंसेवी संस्था, बचत गट व रहिवासी संस्था या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यासोबतच पनवेल भाजपतर्फे ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply