Breaking News

बेणसेत रुग्ण वाढले

नागोठणे : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील बेणसे या गावात राहणार्‍या एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा तसेच घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. या सर्वांना पुढील उपचारासाठी पनवेलला हलविण्यात

आले आहे.

संक्रमित रुग्ण राहात असलेल्या बेणसे गावातील भाग कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे नागोठणे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

माणगाव तालुक्यातील 71 पैकी 56 रुग्ण बरे

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील 27 गावांतून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले 71 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 56 रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी गेले, तर इंदापूरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

 माणगाव तालुका लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यापर्यंत कोरोनामुक्त होता, मात्र चौथ्या टप्प्यापासून तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. 71 लागण झालेल्यांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई व अन्य भागातून आलेले आहेत. जनतेने कोरोना विषाणूला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी सरकारने केलेल्या सूचनेनुसार प्रशासनाच्या आवाहनाला साथ देऊन सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply