Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा बोनशेत ग्रामस्थांचा निर्णय; पंच कमिटी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलच्या सर्वसमावेशक विकासासाठी कार्यसम्राट आमदार आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा निर्णय बोनशेत ग्रामस्थांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने गावच्या पंच कमिटीने शुक्रवारी

(दि. 11) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून गावे, शहरे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाच प्रकारे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असताना बोनशेत येथील ग्रामस्थांनी विकासमूर्ती आमदार प्रशांत ठाकूर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंच कमिटीने भाजपचा झेंडा हाती घेतला.

या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील व पंढरीनाथ फडके यांच्या प्रयत्नांतून जगन फडके, जोमा फडके, गणेश फडके, तुकाराम फडके, अरुण फडके, बाळाराम फडके, अनंता फडके हे पंच भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचे अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले. या प्रचार दौर्‍यात भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हादकेणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत आदी पदाधिकारीही सहभागी झाले होते, तर स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply