Breaking News

जासई हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष  कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास गाव अध्यक्ष यशवंत घरत, सेनादल अध्यक्ष पद्माकर घरत, विद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, ज्युनिअर विभाग प्रमुख शिंदे, डी. बी. म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply