लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
कामोठे ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या दुसर्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.10) झाला. निखरता भारत या शीर्षकाखाली हा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी कला, क्रीडा, वक्तृत्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, मुंबई उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय उपसचिव अशोक मांडे, संस्थेचे रायगड विभाग निरीक्षक रोहिदास ठाकूर, रायगड विभाग उपनिरीक्षक शहाजी फडतरे, भाजप ओबोसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, कामोठे लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल शाळा समिती सदस्य आशा भगत, कामोठे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यु. कॉलेज प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, फातिमा मुल्ला, गव्हाण शिवाजी शाळा मुख्याध्यापक घोडके सर, मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, रयत शिक्षण संस्था रायगड विभाग वरिष्ठ लिपिक गुजर सर, विश्वनाथ कोळी, सुषमा पाटील विद्यालय प्राचार्य मंदार सर, विकास घरत, हॅप्पी सिंग, वर्षा प्रशांत ठाकूर, सीनियर संयोजक सोनाली पवार, स्वाती बालस्कर, प्राथमिक समन्वयक अर्चना माथूर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण केले.