Breaking News

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात इतिहास विभाग आणि आय.क्यू. ए. सी. यांनी संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत शुक्रवारी (दि. 23) सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या आणि शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह (Recent Ternds in Social Science, Humanities and Education) याविषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मॉरिशियस विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ प्रो. राजेन सुंटू, पुत्र मलेशिया विद्यापीठातील इंग्रजी विभागातील प्राध्यापिका प्रो. मनीमांगी मानी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ऐतिहासिक अभ्यास केंद्रातील प्राध्यापक प्रो.उमेश कदम आणि मिझोरम विद्यापीठातील इतिहास आणि मानववंश विज्ञान विभागाचे प्राध्यापक प्रो. किशोर गायकवाड हे प्रमुख वक्ते लाभले होते.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ मॉरिशियस विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ प्रो. राजेन सुंटू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ऐतिहासिक अभ्यास केंद्रातील प्राध्यापक प्रो.उमेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील, आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ.एस.एन.वाजेकर,कला शाखा प्रमुख प्रो. डॉ. बी.एस.पाटील उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाच्या प्रचार्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली. तसेच परिषदेच्या निमंत्रिका व इतिहास विभागप्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले तर प्रो.डॉ. बी. डी. आघाव यांनीप्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे समाजशास्त्रज्ञ प्रो. राजेन सुंटू यांनी बीजभाषण दिले.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. येवले यांनी केले, तर रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर यांनी आभारप्रदर्शन केले. त्यानंतर झालेल्या सत्रामध्ये प्रो. मनीमांगी मानी यांनीसाहित्य क्षेत्रातील जागतिक पातळीवरील नवीन प्रवाह या विषयावर व्याख्यान दिले, तर प्रो.उमेश कदम यांनी वैचारिक सुसूत्रता:सामाजशास्त्रातील अध्यापनशास्त्रीय आव्हाने, प्रो. किशोर गायकवाडयांनीजागतिक इतिहास आणि सार्वजनिक इतिहासाच्या विशेष संदर्भासह इतिहासलेखनातील अलीकडील प्रवाह या विषयांवर व्याख्याने देऊन उपस्थितांना उद्बोधित केले. त्यानंतर झालेल्या शोधनिबंध सादरीकरणच्या सत्रात 22संशोधकांनी शोधनिबंधांचे वाचन केले. तसेच या परिषदेसाठी विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचा सांगता समारंभ शुक्रवारी झाला. या वेळी एसआयसीइएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, अंबरनाथच्या प्राचार्या प्रो. डॉ. स्वप्ना समेळ, दूर व मुक्त अध्ययन विभागाचे सहसंचालक प्रा. अनिल बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रो.डॉ. स्वप्ना समेळ यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि नवीन शैक्षणिक धोरण,2020 च्या अनुषंगाने शिक्षणक्षेत्रातील बदल या विषयावर माहिती दिली. तद्नंतर परिषदेच्या निमंत्रिका व इतिहास विभागप्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी संपूर्ण परिषदेचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी सुंबे आणि जसप्रित कौर या इतिहास विभागाच्या विद्यर्थीनींनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. भावेश भोईर यांनी केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्द्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.एस. के. पाटील,आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनी इतिहास विभागाचे कौतुक केले.
मराठे कालीन नाण्यांचेही प्रदर्शन
आंतरराष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून पुरातन नाणी संग्राहक व प्रदर्शक प्रशांत ठोसर यांनी मराठे कालीन नाण्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले व त्यामाध्यमातून शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आला. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे आणि प्रा. भावेश भोईर आणि इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनीअथक परिश्रम घेतले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply