पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. कामोठे येथे हेच दृश्य पाहायला मिळाले. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कॉलनी फोरमचे उपाध्यक्ष, प्रमुख समन्वयकांनी शेकडो समर्थकांसह संघटनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला.
कामोठे कॉलनी फोरमचे उपाध्यक्ष डॉ.सखाराम गारळे, मुख्य समन्वयक राहुल आग्रे आणि राहुल बुधे, तसेच रवींद्र पाढी, तुषार दळवी, चंद्रकांत यादव, प्रभाकर अडेकर, निरव नंदोला, रेणु सचदेवा, लता आनंद, नारायण चौधरी, भुषण यादव, दर्शन आनेकर, कृष्णा ननावरेमपवन तांदळेकर, तुषार मोटे, विकास बुधे, विशाल बंडगर, प्रसाद जगदाळे, पी.के.वर्षा, रघुवीर खंडुरी, दिलीपकुमार नेहरू, आर.सि.शर्मा, अक्षय पोकळे, राम चव्हाण, विजय मोहोद, जालिंदर सुंबरे, आदर्श तळे यांनी कॉलनी फोरम सोडून शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी डॉ.सखाराम गराळे म्हणाले की, काही लोक भाजपच्या विकास आणि धोरणांच्या विरोधात अजेंडा चालवत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास हे मिशन पूर्ण होत आहे. मी राजकारण नाही तर सामाजिक उन्नती आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कॉलनी फोरमची स्थापनेसोबत होतो, मात्र काही मुद्द्यांवर फोरममध्ये राजकारण सुरू झाले, आणि ते योग्य नव्हते. त्यामुळे फोरमला सोडत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनतेला न्याय देण्यात यशस्वी होईल, असा विश्वास डॉ. गारळे यांनी व्यक्त केला.
पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, हरेश केणी, बबन मुकादम, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका मोनिका महानवर, हेमलता गोवारी, कुसूम म्हात्रे, आबासाहेब गलंडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, प्रदीप भगत, भाऊ भगत, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, कामोठे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …