Breaking News

दिघोडे खाडीपूल कोसळून दोन ठार; दोन गंभीर

उरण : तालुक्यातील धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतून मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासींच्या अंगावर पूल कोसळून दोन आदिवासींचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 26) सायंकाळी 7 वा. चे सुमारास घडली. धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत आदिवासी मासेमारीसाठी गेले असता खाडीवरील काँक्रिट पूल अचानक आदिवासीच्या अंगावर कोसळला. या अपघातात अविनाश सुरेश मिरकुटे (रा. सापोली, ता.पेण), राजेश लक्ष्मण वाघमारे
(रा. वरसई कटोरी ता.पेण) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गुरु सदानंद कातकरी व सुरज श्याम कातकरी (रा.वेश्वी आदिवासीवाडी, उरण) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल. घटनास्थळी उरण गुन्हे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे त्यांचे पथक दाखल झाले आणखी कोणी अडकले आहे का, याचा तपास करीत आहेत.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply