Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बैलगाडी शर्यतींचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महाशिवरात्री उत्सवानिमित्त आणि सिद्धेश नंदराजशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे या छकड्याच्या बिनजोड जंगी शर्यतीचे आयोजन मंगळवारी (दि.12) करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील ओवळे येथील गावदेवी मैदानात रंगलेल्या या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या वेळी उद्योजक नंदराजशेठ मुंगाजी, ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश गायकवाड, माजी सरपंच अमित मुंगाजी, दापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गजाजन पाटील, सदस्य सदन डाऊर, जनार्दन पाटील, मिथुन जितेकर, ऋषभ म्हात्रे, अमर जितेकर, रोशन जितेकर, गजानन जितेकर, राजकुमार जितेकर, विष्णू घोपकर, भगिरथ जितेकर, ध्रुव पाटील, मेघनाथ म्हात्रे, रोशन म्हात्रे, राकेश गायकवाड, प्रदीप म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी सिद्धेश मुंगाजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply