Breaking News

भाजप किसन मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रेेतून शेतकर्‍यांशी संवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून ग्राम परिक्रमा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप किसन मोर्चाच्या वतीने आयोजित या यात्रेत शेतकर्‍यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानुसार पनवेल विधानसभा मतदारसंघातील शिवकर, नेरे, वाकडी, वावंजे, कानपोली, वलप या गावातील शेतकर्‍यांशी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रा अभियान राबविले जात आहे. मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना, इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट, कृषी पायाभूत सुविधा निधी, प्रधानमंत्री किसान संपदा योजना, राष्ट्रीय गोकुळ मिशन, आयुष्यमान भारत योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान रेल, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना यांसारख्या शेतकरी हिताच्या राबविलेल्या आश्वासक योजनांची माहिती देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
पनवेल मतदारसंघामध्ये किसान मोर्चाच्या वतीने शिवकर, नेरे, वाकडी, वावंजे, कानपोली, वलप या गावांमध्ये शेतकर्‍यांच्या घरी भेट देत त्यांना केंद्र आणि राज्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी गाई आणि ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली तसेच शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आणि कडधान्य पिकविण्याचे आवाहन करणार करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कानपोली येथील शेतकरी सज्जन गोवर्धन पवार यांना नुकताच देण्यात आला होता. त्याबद्दल त्यांचा या ग्राम परिक्रमा यात्रेदरम्यान मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्राम परिक्रमा यात्रेत भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर येथे सरपंच आनंद ढवळे, किसान मोर्चाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सागर सांगडे, हरिश्चंद्र घरत, शिवकर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रांजल पाटील, सदस्य रितू पाटील, मोनिका पोपेटा, संतोष मते, मनीषा ढवळे, सुरेखा टोपले, रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, रेश्मा पाटील, गोटीराम ढवळे, आंबो ढवळे, गोपाळ पाटील, तुकाराम तुपे, शालिक पाटील, एल.एन पाटील, बबन ढवळे, संतोष ढवळे, राजकुमार ढवळे, जनार्दन चौधरी, हरिश्चंद्र घरत, वसंत ढवळे, सागर ढवळे, धरती पाटील, नेरे येथे सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच वंदना रोडपलकर, सदस्य राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, माजी उपसरपंच नीलिमा पाटील, कल्पना वाघे, अ‍ॅड. मनीषा गायकर, सविता चोरघे, अमित गवते, सुनील पाटील, गोटीराम म्हात्रे, अंबो रोडपालकर, माया म्हात्रे, भरत काकडे, किशोर खारके, निलेश पाटील, विद्याधर चोरघे, बाळकृष्ण म्हात्रे, नेरे शक्ती केंद्र प्रमुख रोशन पाटील, वावंजे येथे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, ग्रामपंचायत सदस्य नासिर शेख, सचिन पाटील, उल्हास पाटील, धर्मनाथ सांगडे, गणपत पाटील, संजय जोगले, गजानन पाटील, नारायण मढवी, कानपोली आणि वपल येथे बाळकृष्ण पाटील, मंजुळा पाटील, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील, आंबो पाटील, कचरू साळुंखे, निर्वती पाटील, सजन पवार, आत्माराम पाटील, अरुण पाटील, संजोग पाटील, प्रभाकर पाटील, वसंत पाटील, नवनाथ खुटारकर, संतोष पाटील, वाकडी येथे माजी सरपंच नरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply