पनवेल : रामप्रहर वृत्त
विकासाचे पर्व पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चौटा लोकसभा प्रवास दौर्यानिमित्त महाराष्ट्र दौर्यावर आले आहेत. या दौर्याअंतर्गत त्यांनी पनवेलमध्ये रविवारी (दि. 17) सभा घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
ते म्हणाले की, भारताला महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपवर सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रेरित करतात, पाठबळ देतात. त्यामुळे आपल्या समाजातील प्रत्येक घटक आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
या वेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, भाजप दक्षिण रायगड सेलचे जिल्हाध्यक्ष माधुरी श्रीनिवास कोडरू, अनिता संतोष शेट्टी, बाभुबली शेट्टी, शिवाजी भगत, अक्षय सिंग, गणेश शेट्टी, योगेंद्रम खोतरी, सुजित पूजारी, आशा शेट्टी आदी उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …