Breaking News

सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून सक्षम बनविले-लोकनेते रामशेठ ठाकूर

माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे यांनी भूषविले. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रो. (सीए) प्रदीप कामतेकर, उपाध्यक्ष वैभव देशमुख,  मयुरेश नेतकर, माजी विद्यार्थी संघाचे सचिव डॉ. भूषण लांगी, सहसचिव सी.ए.राहुल पाबरी, माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार सौरभ भगत आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली. या वेळी प्राचार्य  प्रो. (डॉ.) एस. के. पाटील आणि आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स विद्याशाखांचे प्रमुख आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत आणि स्वागतगीताने झाली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला.
सोहळ्याचे प्रमुख पाहुणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माजी विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की, आपल्या शिक्षणाचा वापर आपल्यासाठी व समाजासाठी कसा होईल याचा विचार करत असताना  महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा.
दरम्यान, ज्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय आर्थिक योगदान दिले अशा माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या वेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रो. (सीए) प्रदीप कामतेकर यांनी माजी विद्यार्थ्याना त्यांची महाविद्यालाया प्रती असणार्‍या जबाबदारीची जाणीव करून देऊन महाविद्यालयाला बौद्धिक आणि वित्तीय स्वरुपात साहाय्य करावे, असे आवाहन केले. तसेच बी.एन.एन. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांनी सीकेटी महाविद्यालयाचे विविध उपक्रम त्यांच्या महाविद्यालयात अवलंबून त्यांच्या महाविद्यालयाची प्रगती सध्या केली म्हणून सीकेटी महाविद्यालायाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि व्यवस्थापक मंडळाचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी असणारी नाळ अशीच जपावी व त्याचबरोबर महाविद्यालयाच्या विकासासाठी वित्तीय योगदान द्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित 687 माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघामध्ये नोंदणी कारण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले आणि माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे आभारप्रदर्शन माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केले तर प्रा. डॉ. आर. व्ही. येवले यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply