Breaking News

शहरांप्रमाणे गावांचाही विकास होणार; सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही, रोडपाली, खिडूकपाड्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवभारत घडविण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत. येत्या काळात शहरांप्रमाणे गावांचाही नियोजनबद्ध विकास होणार आहे. ग्रामीण भागात येत्या काळात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 8) दिली. ते खांदा कॉलनीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

रोडपाली आणि खिडूकपाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर पाटील, महादेव मधे, राजू शर्मा, नगरसेविका सीता पाटील, भाजपचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे, शंकुनाथ भोईर, मिननाथ भोईर, डी. एन. मिश्रा, राजू बनकर, अमर ठाकूर, शशिकांत शेळके, सचिन चौधरी, सितू शर्मा, जमीर शेख, रवी पाटील, कडव, धनवडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणार्‍यांचे स्वागत करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपण भाजपमध्ये प्रवेश केलात याचा अभिमान वाटेल असे काम तुमच्या बरोबरीने आपण सर्वजण मिळून करणार आहोत. भाजप हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या न्यायाने काम करीत आहे. कालच पंतप्रधानांच्या हस्ते तीन मेट्रो रेल्वेमार्गांचे भूमिपूजन झाले. यातील एक कल्याण ते तळोजा मेट्रो आहे. येत्या 11 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तळोजा येथे आपल्या नवी मुंबई मेट्रोला झेंडा दाखविणार आहेत. त्या वेळी अधिकृतपणे या मेट्रोची चाचणी घेण्यात येईल आणि पुढील वर्षी फेबु्रवारी-मार्चमध्ये बेलापूर ते पेंधर मेट्रो धावायला लागले. त्याचा पुढचा टप्पा पेंधर ते तळोजा एमआयडीसी आणि तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर असा असणार आहे. ही मेट्रो खिडूकपाडापासून प्रवास करीत येणार आहे.

सर्वांना घरे, शौचालय, गॅस सिलिंडर मिळावेत हा भाजप सरकारचा आग्रह आहे. शहरी पट्ट्यांप्रमाणे ग्रामीण भागातही विकासाची गंगा पोहोचण्यासाठी भाजपचे नेते आणि सरकार समन्वयाने काम करीत आहेत. पनवेल महापालिका हद्दीत विविध कामे हाती घेण्यात आली असून, त्यांची टेंडरही निघाली आहेत असे सांगून, पनवेल शहरात उभ्या राहिलेल्या 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी

या वेळी दिली.

– यांनी केला पक्षप्रवेश

खिडूकपाडातील कार्यकर्ते : ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर उलवेकर, हरी उलवेकर, निवृत्ती उलवेकर, ज्ञानेश्वर उलवेकर, वसंत उलवेकर, शरद उलवेकर, सतिश उलवेकर, संदेश उलवेकर, संयोग उलवेकर, वासुदेव उलवेकर, मयूर उलवेकर, रोहीत उलवेकर, जनार्दन उलवेकर, विष्णू उलवेकर, धनाजी उलवेकर, नरेश उलवेकर, रोशन उलवेकर, उमेश उलवेकर, महेश उलवेकर, भाया उलवेकर, पंकज उलवेकर, जगदीश उलवेकर, राजेश उलवेकर, रोशन उलवेकर, रोहित उलवेकर, विजय उलवेकर, चांगदेव उलवेकर, आकाश उलवेकर, हरिश्चंद्र उलवेकर, शंकुनाथ उलवेकर, दर्शन भोईर, यशवंत घरत, राजेश भोईर, अनिल उलवेकर, प्रकाश पाटील.

-खिडूकपाडा महिला मंडळ

रोहिणी उलवेकर, राणूबाई उलवेकर, वर्षा उलवेकर, पूनम उलवेकर, ज्योती उलवेकर, वासंती उलवेकर, ताईबाई उलवेकर, ताई गोपाळ पाटील, आशा पाटील

-रोडपाली

सुरेश ठाकूर, विजय ठाकूर, प्रवीण म्हात्रे, रुपेश ठाकूर, बाळू म्हात्रे, राजेश ठाकूर, आदेश उलवेकर, सोमनाथ उलवेकर, आत्माराम उलवेकर, मारुती उलवेकर.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप यांच्यात आता राम राहिलेला नाही. विकास करायचा असेल, तर भाजपशिवाय पर्याय नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखाहून अधिकच्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागा.

-अरुणशेठ भगत, पनवेल ता. भाजप अध्यक्ष

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply